काँग्रेसकडे बांगलादेशी स्थलांतरितांना शोधण्याचे धैर्य नाही: अमित शाह

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप या विषयावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान बोलताना संयुक्त पुरोगामी आघाडीच्या माजी सरकारला चांगलेच झोडपले. “काँग्रेसकडे आसाममधील अनाधिकृत बांगलादेशी स्थलांतरितांना शोधण्याचे धैर्य नाही,” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
काँग्रेस व तृणमूल काँग्रेस पक्षासह अन्य विरोधकांनी राज्यसभेमध्ये सुरु असलेल्या नॅशनल रजिस्टार ऑफ सिटिझन्स विषयावरील चर्चेदरम्यान जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे आजच्या दिवसाचे काम तहकूब केले.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज नॅशनल रजिस्टार ऑफ सिटिझन्स द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आकडेवारी कच्च्या स्वरूपाची (Draft) असून ७ ऑगस्टला सुधारित यादी जाहीर होणार आहे. सुधारित यादी जाहीर केल्यानंतरही नागरिकांचे नाव न आल्यास त्यांना ३० ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज करण्याची मुभा देण्यात येणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)