मोदींच्या महासंवादवर काँग्रेसने केली खोचक टीका

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकींना डोळ्यासमोर ठेऊन भाजप वेगवेगळे अभियान राबवित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपयोग प्रचारक म्हणून केला जात आहे. यानुसार पंतप्रधान आज कार्यकर्त्यांशी आणि काही नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महासंवाद साधणार आहेत. या कार्यक्रमावर कांग्रेस ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कांग्रेसने या ट्वीट द्वारे टीका केली आहे ‘असे पहिल्यांदा होत आहे कि, संपूर्ण देश वायुसेनाचा पायलट सुरक्षित सुटकेसाठी मागणी करत आहे. त्यांचा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी निवडणुकांसाठी प्रचार करत आहे. नामुमकिन अब मुमकिन है!

Leave A Reply

Your email address will not be published.