Congress News – आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठी आणि जागावाटपाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एका समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे.
या समितीत काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचाही समावेश करण्यात आला आहे.
तसेच समितीमध्ये काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, नितीन राऊत यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबईमधील जागावाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप, अस्लम शेख या तिघांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, 23 जुलै रोजी दिल्लीत कॉंग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रदेश काँग्रेस संघटनेत कोणताही बदल होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीतील संख्याबळाच्या आधारे जागावाटप करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.