निवडणूक अधिकाऱ्याविरुद्ध कॉंग्रेसची तक्रार

पुणे – शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलमधील निवडणूक अधिकारी नंबर दोन यांनी “भाजपलाच मतदान करा’ असा प्रचार केल्याचा आरोप करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी थेट खडक पोलिसात तक्रार दिली. त्या निवडणूक अधिकाऱ्याला खडक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यामुळे या बुथवरील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण होते.

कॉंग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब अमराळे हे शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये मतदानाला गेले होते. त्यावेळी तेथील निवडणूक अधिकाऱ्याने त्यांना “भाजपला मतदान करा’ असे सांगितल्याचा दावा अमराळे यांच्याकडून करण्यात आला आहे.

हा गोंधळ सुरू असताना महापौर मुक्ता टिळक आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोशी तेथे आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची तक्रार पोलिसांत देण्यासंबंधिच्या सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना केल्या. मात्र, या प्रकरणात पोलिसांचा रोल काहीच नसल्याने पोलिसांनी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, कोणताही गुन्हा दाखल केला नाही.

ज्यांनी ही तक्रार केली तेच आपल्याशी बोलत होते. आपण “भाजपलाच मतदान करा’ असे बोललो नसल्याचा खुलासा संबंधित अधिकाऱ्याने दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अजय दराडे आणि संघटक किरण पोकळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.