भाजपची आमदारांना १० कोटींची ऑफर; काँग्रेसचा आरोप 

बंगळुरू – कर्नाटकात राजकीय नाट्य अजून सुरूच असून भाजप आणि काँग्रेस दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. एकीकडे कर्नाटक सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा भाजप करत आहे. तर भाजप घोडेबाजार करून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप  काँग्रेसने केला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कथित ऑडिओ क्लिप पत्रकरांना ऐकवली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी म्हंटले कि, कर्नाटकमधील वृत्त ऐकून संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. कुमारस्वामी यांनी एक ऑडिओ क्लिप जारी केली. यामध्ये येडियुप्पा जेडीएस पक्षाच्या एका आमदाराच्या मुलाशी कर्नाटक सरकार अस्थिर करण्याविषयी बोलत आहेत. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे घाणेरडे राजकारण दिसून येते. ऑडिओ क्लिपमध्ये येडियुप्पा आमदारांना १० कोटींची ऑफर देत आहेत. यानुसार १८ आमदारांसाठी २०० कोटींचा खर्च येईल. ते १२ आमदारांना मंत्रिपदाची तर ६ जणांना वेगवेगळ्या बोर्डाचे चेअरमन बनविण्याची ऑफर देत आहेत. क्लिपमध्ये येडियुप्पा मोदी आणि अमित शहा यांच्या नावांचाही उल्लेख करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.