पुण्यात काँग्रेसचा उमेदवार अजूनही वेटिंगवरच

पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात महाराष्ट्रातील आणखी 5 जणांचा समावेश असला तरी आद्यप पुण्याच्या उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही. त्याच वेळी भाजपकडून पुण्याचे नाव निश्चित करत उद्या (रविवार) पासून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. मात्र, अजूनही काँग्रेस उमेदवार निश्चित नसल्याने कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

दरम्यान, काँग्रेस उमेदवाराच्या यादीतून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे याचे नाव मागे पडल्याने आता माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड तसेच महापालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, पक्षाकडून आद्यपही नाव निश्चित होत नसल्याने उमेदवार निवडीत पक्षात चुरस असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात कोणाला संधी
चंद्रपूर – विनायक बांगडे
जालना – विलास औताडे
औरंगाबाद – सुभाष झांबड
भिवंडी – सुरेश तावरे

Leave A Reply

Your email address will not be published.