नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान सुरु आहे. यासाठी निवणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. अशातच काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी आप कार्यकर्त्याला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला आहे. हर्मेश असे आप कार्यकर्त्याचे नाव आहे.
#WATCH Delhi: Scuffle breaks out between AAP and Congress workers near Majnu ka Teela, Congress candidate Alka Lamba tries to slap an AAP worker. AAP leader Sanjay Singh has said the party will complain to Election Commission. #DelhiElections2020 (note: abusive language) pic.twitter.com/l5VriLUTkF
— ANI (@ANI) February 8, 2020
अलका लांबा यांनी म्हंटले कि, हर्मेशने त्यांच्या मुलाविषयी आपत्तीजनक टिपण्णी केल्याने त्याला कानशिलात लगावली असल्याचे सांगितले आहे. मात्र, आप कार्यकर्त्याने म्हंटले कि, अलका लांबा यांना सिम्बल घेऊन बुथवर येण्यास विरोध केल्याने त्यांनी हे कृत्य केले. यासंबंधीची तक्रार धर्मेशने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Alka Lamba: As soon as I came out from polling booth I saw son of AAP candidate arguing with the police over getting admission inside polling booth. At that moment, an AAP worker Harmesh used abusive language against me. Thank the police who arrested him immediately. https://t.co/Ps49gTjZXQ pic.twitter.com/fXPVBAnCnR
— ANI (@ANI) February 8, 2020
दरम्यान, दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) अलका लांबा यांनी मागील वर्षी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 25 वर्षांच्या खंडानंतर त्या स्वगृही परतल्या आहेत.