काँग्रेसचा मोठा वार ! भाजपवर १८०० करोडची लाच घेतल्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली: काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. काँग्रेसने म्हटले आहे, १४ फेब्रुवारी २०१७ ला काँग्रेसने बीएस येदियुरप्पा आणि स्व. अनंत कुमार यांचा एक व्हिडीओ प्रदर्शित केला होता. यामध्ये १८०० करोड पेक्षा अधिक लाच भाजपला दिली असल्याचे समोर आले होते.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर भाजपवर आरोप केले. २६९० करोड रुपये वसूल करण्यात आले. ज्यामध्ये १८०० करोड रुपये भाजपाला देण्यात आले. मे २००८ ते २०११ जुलै दरम्या, येदियुरप्पा मुख्यमंत्री होते. तसेच १ हजार करोड रुपये भाजपच्या केंद्रीय मंडळाकडे देण्यात आले. यामध्ये नरेंद्र मोदी, अरुण जेटली, राजनाथ सिंह, नितीन गडकरी असे अनके नेत्यांचे नावे असल्याचे सुरजेवाला म्हणाले.

सुरजेवाला यांनी भाजपला काही प्रश्न विचारले आहेत ?

नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वावर १८०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. हे असे लोक आहेत जे देशाच्या सर्वोच्च पदांवर आहेत. ज्यांच्याकडे संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पीएमओ खाते आहेत. कर्नाटकच्या येदियुरप्पा सरकारकडून भाजपला १८०० कोटी रुपयांची लाच आली, हे खोटे आहे का?

हे खरे आहे खोटे, डायरी आणि त्याची सर्व नोंदींवर येदियुरप्पाची स्वाक्षरी आहे, हे आयकर विभागाजवळ सुद्धा आहे. हे खरं आहे, तर याची चौकशी का नाही केली?

https://twitter.com/AICCMedia/status/1109014030075736065

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)