पुणे – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मध्ये महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच; राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. यामुळे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवारांविरोधात काँग्रेस आणि मार्क्स कम्युनिस्ट पक्षाने बालगंधर्व येथे आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपविरोधात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यपालांच्या विरोधात घोषणा दिल्या.