काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर आरोप ; निवडणूक आयोगाने चौकशी करण्याची मागणी

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी आपल्या निवडणूक अर्जात गुजरातच्या गांधीनगरमधील एका भूखंडाबाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी याबाबत निवडणूक आयोगाने कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

खेरा म्हणाले, नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक भूखंड घेतला होता, आणि त्याबद्दल त्यांनी 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणूकीत आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात चुकिची माहिती देली आहे.  सुप्रीम कोर्टात सोमवारी एक जनहीत याचीका दाखल केली आहे. यात मोदींच्या संपत्तीबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.