देवेंद्र फडणवीस यांच्या कुंभमेळ्यातील स्नानावर काँग्रेसची टीका

पुणे – महाराष्ट्रातील 16 हजार शेतकरी आत्महत्यांचे पाप आणि 16 मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे डाग कुंभमळ्यातील स्नानाने धुऊन निघणार नाहीत, अशी टीका काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

दरम्यान महाशिवरात्री दिवशी मुख्यमंत्र्यांनी प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली होती. तिथे त्यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले होते. त्यांनतर त्यांनी यासंदर्भातील फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करत माहिती दिली.  काँग्रेसने या ट्विटला अनसरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, “फडणवीस साहेब, महाराष्ट्रातील १६ हजार शेतकरी आत्महत्यांचे पाप आणि १६ मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे डाग कुंभमेळ्यातील स्नानाने धुऊन निघणार नाहीत”.

आगामी महिन्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमुळे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप करण्याची एक संधी देखील राजकीय पक्षाकडून सोडली जात नाही. यापुढे  निवडणूका होईपर्यंत हे आरोप-प्रत्यारोप होतच राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)