ट्रम्प यांनी दिल्या नवीन प्रशासनला शुभेच्छा; म्हणाले…

वॉशिंग्टन – अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे नवीन प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेला सुरक्षित, समृद्ध ठेवण्यात यावे अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. अमेरिकेने आपल्या तत्वांची जपणूक करावी आणि सामूहिक इच्छाशक्‍ती कायम अबाधित राखावी, अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्‍त केली. 

ट्रम्प यांनी अद्यापही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणूकांचा निकाल पूर्णपणे स्वीकारलेला नाही. आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये त्यांनी नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा उल्लेख देखील केलेला नाही. मात्र या महिन्यात कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक निदर्शनांचा त्यांनी ओझरता उल्लेख केला.

आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळत्‌ अमेरिकेला पुन्हा एकदा “महान अमेरिका’ बनवण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे ट्रम्प म्हणाले. आपल्यासमोर अनेक कठीण आव्हाने होती. अतिशय अवघड पर्यायांची आपल्याला निवड करावी लागली.

कारण अमेरिकेच्या नागरिकांनी तेवढ्यासाठीच आपली अध्यक्ष म्हणून निवड केली होती. अमेरिकेची गरज आपल्यासाठी सर्वाधिक महत्वाची होती. सरतेशेवटी आपण जे साध्य केले त्याब्द्दल आपल्याला सार्थ अभिमान आहे. अध्यक्षपदाचे कार्य करणे हा वर्णनापलीकडचा सन्मान आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.