‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो, यंदाची बकरी ईद राज्यावरचं कोरोना संकट दूर करणारी ठरो, अशा शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचं संकट संपल्यानंतर ‘बकरी ईद’सह सर्व सण पूर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वासदेखील उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.