“बधाई दो’चे शूटिंग भूमी, राजकुमारने संपवले

मुंबई – भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांनी त्यांच्या आगामी “बधाई दो’ चे शूटिंग संपवले आहे. “बधाई दो’मध्ये भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव प्रथमच एकत्र काम करत आहेत. 

भूमी पेडणेकरने इन्स्टाग्रामवरच्या एका पोस्टमध्ये राजकुमार आणि डायरेक्‍टर हर्षवर्धन कुलकर्णीबरोबरचे दोन फोटो पोस्ट केले आणि “बधाई दो’चे शूटिंग संपल्याचे जाहीर केले. 

या शूटिंगदरम्यान आम्ही काय धमाल केली, हे कधीही विसरू शकणार नाही. सतत हास्यविनोद आणि एकमेकांची चेष्टा मस्करी चालली होती, असेही भूमीने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

“बधाई दो’ हा आयुष्मान खुरानाच्या “बधाई हो’चा सिक्वेल आहे. त्याचीच हसवणूक या सिक्‍वेलमध्येही कायम राहणार आहे. जोडीला राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर हे नवीन कॉम्बिनेशन असणार आहे.

“बधाई हो’ला अपारंपरिक कथाबीज श्रेणीमध्ये 2019 सालचा सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. सिक्‍वेल असल्याप्रमाणेच “बधाई दो’ हा एक फॅमिली कॉमेडी ड्रामा असणार आहे. 

“बधाई हो’ आणि “बधाई दो’ हे दोन्ही फॅमिली कॉमेडी ड्रामा आहेत, हा एवढाच दोन्हीमध्ये समान धागा आहे. पण सिक्‍वेलची कथा प्रिक्वेलपेक्षा पूर्ण वेगळी असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.