पुन्हा करोना चाचणीची शिक्षकांमध्ये धास्ती

करोनामुळे काही शहरातील शाळा सुरू करण्याचा कालावधी वाढवला

 

पुणे – शहरातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. त्यामुळे बहुतांश शिक्षकांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार करोना चाचणी करून घेतली. आता शाळा दि. 13 डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चाचणी केलेल्या शिक्षकांना पुन्हा शाळा सुरू करण्यापूर्वी करोना चाचणी करावी लागणार आहे, असा प्रश्‍न शिक्षकांतून उपस्थित होत आहे.

राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर करीत, त्यानुसार राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा दि. 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले. याचदरम्यान मोठ्या शहरांत करोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने स्थानिक परिस्थितीचा विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविला.

त्यामुळे पुण्यातील करोनाची स्थिती लक्षात घेत महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकत दि. 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहतील, असे जाहीर केले. दरम्यानच्या काळात शाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका हद्दीतील सर्व शिक्षकांना करोना चाचणी करून घेणे बंधनकारक केले होते. त्यानुसार बहुतांश शिक्षकांनी ती करून घेतली.

काहीजण अजूनही करून घेत आहेत. त्याचे रिपोर्ट आता मिळू लागले आहेत. शिक्षकांची करोना चाचणीचा रिपोर्ट पाहून त्यांना शाळेत बोलावून घेण्यात येत आहे. शहरातील शाळांतील शिक्षकांची करोना चाचणी करून घेण्याचे प्रमाण अंतिम टप्प्यात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.