अहमदाबाद,- गुजरातमधील कांडला बंदरावर सुमारे 4 हजार गव्हाचे ट्रक चार दिवसांपासून उभे आहेत. जहाजांमध्ये गहू उतरवण्याची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा त्यांना आहे. त्या ट्रकमध्ये काही महाराष्ट्रातीलही आहेत.
सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून गहू उतरवण्याची परवानगी मिळू शकली नाही. अशातच केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे ट्रकमधून जहाजांवर गहू उतरवण्याबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला.
संबंधित ट्रकबरोबरच कांडला बंदर संकुल आणि तेथील गोदामांमध्ये तब्बल 25 लाख टन गव्हाचा साठा असल्याचे समजते. कांडला बंदरावरून प्रामुख्याने बांगलादेश, दक्षिण कोरिया, येमेन आणि आफ्रिकी देशांना गहू पाठवला जातो.