Pune News : पुण्यात महिला कारागृहाच्या मैदानी चाचणीसाठी पोलीस मुख्यालय असलेल्या शिवाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर आज पहाटे पासून मुलींची गर्दी झाली होती. पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मोठा फज्जा उडून गोंधळ उडाला. लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घसुल्या असल्याची घटना घडली आहे. या गोंधळात अनेक मुली जखमी झाल्या आहेत. काही मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 513 कारागृह पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असून गेटवर ३००० हून अधिक मुलींनी गर्दी केल्यामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरानंतर पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकी कशी घडली घटना?
सदरील भरती ही २०२२-२३ मधील पुणे कारागृह पोलिस भरती म्हणून रखडलेली आहे. एकूण 513 जागेसाठी ही रखडलेली भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीची परीक्षा घेण्यात येत आहे. आज सकाळी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात पोलिस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि ही घटना घटना घडली. या घटनेत अनेक मुलींना दुखापत झाली आहे. काही मुलींच्या पायला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याची माहिती आहे. यावेळी स्थानिक पोलिसांशी बाचाबाची देखील झाली.
पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया
या घटनेनंतर पोलिस अधिकारी पवार म्हणून होते त्यांना देखील पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. खरंतर मुलींनी अनेक महिन्यांपासून या भरतीसाठी तयारी केली आहे. मैदानी चाचणीसाठी प्रचंड वेळ आणि मेहनत खर्ची केली आहे. पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे.