करोनाच्या मेसेजमुळे मांसाहारी खाद्यप्रेमींमध्ये संभ्रम

पुणे – करोना व्हायरसबाबत अनेक गैरसमज पसरबिणारे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्राण्याच्या मांसातून हा व्हायरस पसरत असल्याचे मेसेज व्हायरल होत असल्याने, मांसाहारी खाद्यप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी जीभेचे चोचले पुरविणे थांबविले आहे.

चीनमधील करोना व्हायरसच्या प्रादूर्भावाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे चीनच्या नागरिकांना अन्य देशांत प्रवेशबंदी केली आहे. सध्या या व्हायरसबाबत दक्षता घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. त्याचबरोबरच करोनाचा प्रादूर्भाव प्राण्यांच्या मांसामधून होत असून, पुराव्यादाखल मांसाचा बाधित तुकडा दाखविला जाणारा मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक मांसाहारीप्रेमींनी जीभेचे चोचले पुरविण्यावर बंधने घातली आहेत. याशिवाय चीनमधील करोनाबाधित रुग्णांना जीवे मारण्यासाठी चीन सरकार प्रयत्न करत असल्याचा मेसेजदेखील व्हायरल होत असल्याने खाद्यप्रेमींबरोबरच नागरिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, भारतीय डॉक्‍टरांच्या नावे करोनावरील औषध शोधल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, अशाप्रकारचे कोणतेही औषध सापडले असल्याचा दावा आरोग्य विभागाने फेटाळून लावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.