शिक्रापूर – (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी परिसरात बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेत त्याच्याकडून चार रेमडीसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला यश आले असून अमित देविदास पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील बजरंगवाडी परिसरात एक युवक बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार अमरदिन चमनशेख, पोलीस शिपाई मिलिंद देवरे, किशोर शिवणकर, लक्ष्मण शिरसकर, निखिल रावडे, अमोल दांडगे, जयराज देवकर यांसह आदींनी बजरंग वाडी परिसरात जात सापळा लावला असता त्यांना एक संशयित युवक आलेला दिसून आला त्यावेळी पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे दिली यावेळी पोलिसांनी त्याचे जवळील पिशवीत तपासणी केली असता तब्बल चार रेमडीसिवीर इंजेक्शन मिळून आले,
यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याचे जवळील चार रेमडीसिवीर इंजेक्शन जप्त केले असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमित देविदास पवार (वय २३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) याचे विरुध्द गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.