#CWC19 : आत्मविश्‍वास हेच आमच्या यशाचे गमक – बाबर आझम

बर्मिगहॅम  – भारताकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतरही आम्ही खचलो नाही. आपल्याला अजूनही उपांत्य फेरीच्या आशा आहेत. असा आत्मविश्‍वास ठेवीतच आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खेळलो ब विजयी झालो, असे पाकिस्तानचा शतकवीर बाबर आझम याने सांगितले.

बाबर हाच पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने हॅरिस सोहेलच्या साथीत शतकी भागीदारी करीत संघाचा डाव सावरला एवढेच नव्हे त्यांनी संघाचा विजय दृष्टिपथात आणला. भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरविले व पाठोपाठ येथील सामना जिंकून त्यांनी शानदार पुनरागमन केले आहे. त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. बाबर म्हणाला की, भारताविरूद्धच्या पराभवातून आम्हाला खूप काही शिकावयास मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.