शंखाकृती प्रत्यारोपण

कर्णबधिरत्व या एका अपंगत्वामुळे दुहेरी नुकसान होते जसे कमी अथवा न ऐकू येण्याबरोबरच वाचा व भाषा यांची वाढ होत नाही आणि त्यामुळे ते मूल किंवा व्यक्ती बोलू शकत नाही. जन्मतः श्रवणदोष असणारे लहान मुले किंवा वाचा व भाषा विकासाअगोदर येणाऱ्या श्रवणदोषामुळे ही मुले त्यांच्यात असणाऱ्या सुप्तगुणांचा वापर करू शकत नाही. अशा मुलांचे लवकरात लवकर निदान होऊन त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू होणे अत्यंत आवश्‍यक असते.

असे झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा दर्जा चांगला राहून ही मुले सर्वसामान्य समाजात कुठेही मागे पडू शकत नाही. श्रवणयंत्राच्या मर्यादा हळूहळू जेव्हा लक्षात आल्या तेव्हा त्याला उत्तर मिळाले कॉक्‍लीअर इंप्लाट. आजच्या या प्रगत तंत्रज्ञानामुळे कर्णबधिरांच्या पुनर्वसनासाठी आवश्‍यक यंत्रामध्ये मोठी प्रगती झाली. त्यालाच आपण शंखाकृती प्रत्यारोपण असे म्हणतो.

कॉक्‍लीअर इंप्लाट म्हणजे काय?
हे एक उपकरण आहे जे शस्त्रक्रिया करून कानामध्ये (आंतरकर्णात) इलेक्‍ट्रोड बसविला जातो. या इलेक्‍ट्रोड्‌सच्या रचनेला व्यवस्थित संवेदना मिळाव्यात म्हणून कानाच्या बाहेरील बाजूस एक मायक्रोफोन व चुंबक बसविला असतो. अतिसंवेदनशील मायक्रोफोन ध्वनीलहरी गोळा करतो, स्पीच प्रोसेसर ध्वनीचे पृथःक्‍करण संगणकीय पद्धतीने करतो. या संगणकीय ध्वनीचे विद्युतलहरीत रूपांतर होते, इंप्लाटमधील इलेक्‍ट्रोडद्वारे त्या विद्युतलहरी उर्वरीत केशपेशींना संवेदना देतात व मेंदू त्या ध्वनींचे रूपांतर शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न करतो.

कॉक्‍लीअर इंम्लाट कुणासाठी?
लहान मुलांसाठी – आंतरकर्णातील केशपेशी कमजोर झाल्यामुळे दोन्ही कानांमध्ये तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा श्रवणदोष असल्यास, श्रवणयंत्राचा मर्यादित किंवा काहीच फायदा होत नसल्यास, 12 महिन्यांपासून 17 वर्षांपर्यंत अधिक परिणामकारक, मूल वैद्यकीयदृष्ट्‌या सक्षम असल्यास, श्रवणदोष असणाऱ्या मुलांच्या पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन

असल्यास मोठ्या व्यक्‍तिसाठी ः भाषावाढ पूर्ण झाल्यानंतर किंवा भाषावाढ पूर्ण होत असताना तीव्र ते अतितीव्र स्वरुपाचा श्रवणदोष असल्यास, श्रवणयंत्राचा कमी किंवा काहीच फायदा होत नसल्यास, वैद्यकीयदृष्ट्‌या कोणताही गंभीर आजार नसल्यास, दैनंदिन जीवनात सर्वांबरोबर संवाद साधण्याची तीव्र इच्छा असल्यास. एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला कॉक्‍लीअर इंप्लाट बसविले की लगेच ऐकण्याची प्रक्रिया सुरू होते असे नाही, त्यासाठी आवश्‍यक आहे नियोजनबद्ध श्राव्य प्रशिक्षण कार्यक्रम. श्राव्य प्रशिक्षण व वाचा-भाषा प्रशिक्षण शिस्तबद्ध पद्धतीने राबवल्यास साधारणतः एक वर्षामध्ये मुलांचा भाषाविकास, विशेषतः आकलनाची भाषा सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने होऊ शकते. भाषा विकास झाला की मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्व संधी उपलब्ध होऊ शकतात. कॉक्‍लीअर इंप्लाट कर्णबधिरांसाठी एक योग्य पर्याय म्हणून जागतिक स्तरावर मान्य झाले आहे.

सदर कॉक्‍लीअर इंप्लाटसाठी पुण्यातील क्‍युअर हिअरिंग क्‍लिनिक, संतोष हॉल शेजारी, सिंहगड रोड, पुणे येथे मार्गदर्शन केले जाते तसेच बावधन, वारजे येथील क्‍युअर हिअरिंग क्‍लिनिकच्या शाखेमध्ये मध्येही मार्गदर्शन केले जाते. सर्व वयोगटातील नागरिकांसाठी सवलतीच्या दरामध्ये सर्व प्रकारची श्रवणयंत्र (कानामागील, कानातील व अदृश्‍य) वरील सर्व क्‍लिनिकमध्ये दिली जातात. तसेच ही श्रवणयंत्र आपण ई.एम.आय.द्वारे सुद्धा घेऊ शकता. क्‍युअर हिअरिंग क्‍लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या श्रवणचाचण्या, श्रवमयंत्र उपलब्ध आहे व ज्या व्यक्तींना किंवा मुलांना बोलण्या किंवा आवाजामध्ये दोष आहे, त्यांच्यासाठी स्पीच थेरपी दिली जाते.

– डॉ. संदीप चवरे

Leave A Reply

Your email address will not be published.