गुरुकुलकडून स्कूलथॉनचे आयोजन

मुंबई: द स्पोर्टस गुरुकुलकडून स्कूलथॉनचे या महिन्यात देशातील विविध ठिकाणी आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण भारतात स्पर्धा होणार आहेत. पुढच्या पिढीसाठी ऍथलेटिक आणि सदृढ आयुष्याच्या सवयी लावण्याचा या स्कूलथॉनचा उद्देश आहे.

स्कूलथॉन हा मूळ मॅरेथॉनचा छोटा प्रकार असेल. विशेषकरून शाळेतील लक्षात ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

स्कूलथॉनचा सध्याचा हंगाम अहमदाबाद, हैदराबाद व मुंबई येथे आयोजित केला जाणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर याची घोषणा करण्यात आली. यु टू कॅन रनसोबत द स्पोर्टस गुरुकुल असणार असून रेसच्या व्यवस्थापनासाठीच्या सुविधेसोबतच स्पर्धा आयोजन देखील त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.

द स्पोर्टस गुरुकुलचे संस्थापक जय शाह म्हणाले की, युवांमध्ये फिटनेसबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने द स्पोर्टस गुरुकुल यांनी स्कूलथॉनच्या दृष्टीने आणखीन एक पाऊल टाकले आहे.यु टू कॅन रन सोबत स्पर्धा व्यवस्थापनासाठी आम्ही एकत्र आल्याने आनंदी आहोत. येणाऱ्या काळात पॅन इंडिया स्तरावर स्पर्धेच्या आयोजनाचा आमचा
विचार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.