ग्रामीण भागात आरोग्य तपासणीची मोहीम राबवा

भाजप नेते गणेश कुटे यांची मागणी

वाघोली ( प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात  कोविड-19 का शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य वेळेत  तपासणी न केल्याने तसेच त्या पुढील उपचारासाठी विलंब झाल्याने धोक्यात येऊ लागले  आहे. त्यामुळे नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ येऊ लागली असल्याने तात्काळ पुणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नागरिकांच्या लसीकरणा बरोबरच त्यांची आरोग्य तपासणीची देखील मोहीम सुरू ठेवावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांनी केली आहे.

सध्या कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  नागरिकांच्या वेळेत वैद्यकीय तपासणी न करण्यामुळे अथवा उपचार घेण्यास विलंबामुळे नागरिकांना जीवितहानी ला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने नागरिकांना कोविड-19 बाबत आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्या-ज्या योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहेत, त्या- त्या उपायोजना नागरिकांनी स्वतःहून अंगीकाराव्यात.

याशिवाय कोविड-19 ची लक्षणे जाणवल्यास अथवा त्या लक्षणा संदर्भात तातडीने वैद्यकीय तपासणी करून  घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल होण्याची गरज असताना नागरिक वैद्यकीय तपासणी न केल्याने बऱ्याच वेळा अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा नागरिकांना ग्रामीण भागात मिळवून देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.

ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ग्रामीण भागात वैद्यकीय तपासणीची मोहीम सुरु ठेवून नागरिकांच्या आरोग्यासाठी मोलाची कामगिरी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.