नवी दिल्ली : सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचा मुलगा झैन नडेला याचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. तो 26 वर्षांचा होता.
झैन जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराशी झुंज देत होता. सेरेब्रल पाल्सी हा मेंदू आणि स्नायूंशी संबंधित आजार असून लहान मुलांमध्ये आढळतो. हा आजार मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे होतो. या आजाराची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी दिसतात.
झैनच्या मृत्यू संदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीनं कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे कळवलं. सॉफ्टवेअर कंपनीनं आपल्या कर्मचार्यांना ईमेलद्वारे सांगितलं की, झैनचं निधन झालं आहे. या संदेशात अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.