मुंबई – न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचा जीव वाचला असला तरी त्याच्या पायामुळे तो संपूर्णपणे जागेवर आहे.
त्याची अवस्था पाहून मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरलाही दु:ख आवरले नाही. केर्न्स बरा होण्यासाठी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सचिनने प्रार्थना केली आहे. सचिनने ट्विट करत “लवकर बरा हो मित्रा’, असे म्हटले आहे.
Concerned to know about Chris Cairns. Hoping & praying. 🙏🏻
Get well soon mate, the entire cricketing fraternity wishes for your wellbeing.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 27, 2021
आम्ही सगळे तू बरा होण्यासाठी वाट पाहात आहोत. तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत, असे सचिनने म्हटले आहे.