मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा आगामी ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तान्हाजी मालुसरे यांनी इतिहासात गाजवलेल्या शौर्याचं चित्रण या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. अभिनेता अजय देवगन, सैफ अली खान, शरद केळकर आणि अभिनेत्री काजोल अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसून येणार आहे.
A petition has been filed in Delhi High Court regarding Ajay Devgan & Kajol starer upcoming movie ‘Tanhaji-The Unsung Warrior.’Akhil Bhartiya Kshatriya Koli Rajput Sangh Delhi, has approached Court claiming that director of the film has concealed true lineage of Tanaji Malusare. pic.twitter.com/WdPgOv49yw
— ANI (@ANI) December 13, 2019
दरम्यान, आता तान्हाजी हा चित्रपट वादाच्या भोऱ्यात सापडला आहे. अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघ दिल्लीच्या वतीने या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तान्हाजी मालुसरे यांची खरी वंशावळ लपविली असल्याचा आरोप केला गेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबतची याचिका स्वीकार केली असून येत्या १९ डिसेंबरला यायाचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. १० जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.