चिंता वाढली ! पुण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे : पुण्यामध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत चालली आहे. असे असताना आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली. ‘रुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये १९ नर्सचा समावेश आहे. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी ही माहिती दिली आहे.

१२ एप्रिल रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या नर्सच्या संपर्कात आलेल्या ३० कर्चमाऱ्यांची कोरोना तपासणी करुन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा तपासणी अहवाल आला. यामध्ये २५ कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झालेल्या २५ कर्मचाऱ्यांमध्ये १९ नर्सचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.