पुण्यातल्या खासगी रुग्णालयांकडून बेड्सची लपवाछपवी

उपलब्धतेची माहितीच मिळत नाही : अधिकाऱ्यांनाही पाहणीस मज्जाव

पुणे – करोना बाधितांसाठी बेड्स उपलब्धतेबाबत खासगी रुग्णालये महापालिकेच्या विशेष नियुक्त अधिकाऱ्यांना माहितीच दिली जात नाही; एवढेच नव्हे तर वॉर्डमध्ये जाऊन याची पाहणीही करू दिली जात नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील रिक्त बेड्सच्या उपलब्धततेची माहिती मिळू शकत नसल्याचे समोर आले आहे.

 

शहरात ऑक्सिजन बेड सर्व नागरिकांना मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रत्येक रुग्णालयाची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवली आहे. त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. प्रशासनाने अनेक मोठ्या रुग्णालयांबरोबर करार केले आहेत. यातून मोफत उपचार केले जातात.

 

यासाठी करार केलेल्या हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या निश्चित केली आहे. येथे महापालिकेने पाठवलेल्या रुग्णांना दाखल करून घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने यासाठी वॉररुम देखील सुरू केली आहे. परंतु उपलब्ध बेड्सची माहितीच नसल्याने येथून तरी काय सहाय्य होणार, हा देखील प्रश्न आहे. खासगी रुग्णालयांत जाताना महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना पीपीई किट देणे आवश्यक आहे. अथवा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक आवश्यक आहे. यामध्ये बेडची निश्चित संख्या समोर येईल आणि रुग्णांना वेळेत बेड मिळू शकतील, असे मत व्यक्त होत आहे.

 

…तर आम्ही पाहणी करतो

शहरातील अनेक रुग्णालयाचे बेड गेल्या कित्येक दिवसापासून रिकामे होत आहेत की नाही याबाबत नगरसेवकांकडूनही तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर आम्हाला पीपीपीई किट द्या आम्ही रुग्णालयांची पाहणी करतो, अशी मागणी नगररसेवकांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.