सक्‍तीचे मतदान आणि वास्तव

मतदानाची टक्‍केवारी वाढावी यासाठी मतदान सक्‍तीचे करावे, असा एक मतप्रवाह देशात आहे. जगातील काही मोजक्‍या देशात मतदान सक्तीचे केले गेले आहे. यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, सिंगापोर आणि पेरू हे प्रमुख देश आहेत. या देशांमध्ये 18 वर्षांच्या मुलापासून ते 70 वर्षांच्या वृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाला मतदान सक्तीचे केले गेले आहे. याशिवाय लक्‍झमबर्ग, नाउरू, कांगो येथील गणराज्य, तसेच इक्वेडोर व उरुग्वेही या यादीत समाविष्ट आहेत.

स्वित्झर्लंडमधील एकाच ठिकाणी मतदान सक्तीचे आहे. या सर्व नावांमध्ये फक्त ऑस्ट्रेलिया या एकाच देशाला लोकशाहीवर आधारित देश म्हणता येईल. कारण बाकी सर्व अत्यंत लहान राज्ये आहेत. हे सर्व देश बऱ्याच काळापूर्वीपासून कुठल्या ना कुठल्या युगात एखाद्या हुकूमशहाच्या अधिपत्याखाली आले आहेत. यामध्ये फक्त सिंगापूर एकच असा देश आहे, ज्याच्याकडे पाहून प्राचीन युरोपियन शहरांची आठवण होते. या देशांशिवाय ग्रीक, थायलॅंड, तुर्कस्थान इ. अनेक राष्ट्रे आहेत, जिथे मतदान सक्तीचे आहे. पण या कायद्याचा भंग केल्यास शिक्षा होत नाही. काही देशांमध्ये हा कायदा बनवून पुन्हा रद्दही करण्यात आला आहे. नेदरलॅंड्‌स, स्पेन, व्हेनेझुएला आणि चिली ही त्यातील काही नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.