राजगुरूनगर (पुणे) – राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 12) झालेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित आणि दाखलपूर्व 1519 प्रकरणांपैकी पैकी 88 तडजोड झाली. तर तब्बल 9 कोटी 28 लाख 57 हजार 546 रुपयांची वसुली झाली आहे. लोक अदालतमध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेल्या व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉलिंगमाध्यमातून 17 प्रकरणे तडजोडीतून निकाली निघाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार करोना विषाणू संसर्ग फेब्रुवारी 2020 नंतर प्रथमच येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. आठ महिन्यांत वाढलेली दाखल प्रकरणांची संख्या विचारात घेता जास्तीत जास्त प्रकरणे आपापसात तडजोडीने निपटारा करण्यासाठी ही लोकअदालत महत्त्वाची ठरली.
सोशल डिस्टन्स आणि शासनाच्या नियमांचे करीत येथील लोक अदालतची सुरुवात येथील जिल्हा न्यायाधीश एन. के. बह्मे यांच्या हस्ते झाली. यावेळी सह जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबळकर, श्रीमती एस. एस. पाखले, आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, खेड वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. संजय पानमंद, उपाध्यक्ष ऍड. प्रदीप गोरडे, ऍड. प्रफुल्ल गाढवे, ऍड. शीतल बडदे, ऍड. शंकर कोंबल, ऍड. योगेश मोहिते, ऍड. अजय पडवळ, ऍड. शुभांगी डुबे, जेष्ठ विधीतज्ञ ऍड. बी एम सांडभोर, ऍड. पोपटराव तांबे, ऍड. अरुण मुळूक, ऍड. सुभाष कड यांच्यासह वकील पक्षकार उपस्थित होते.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील न्यायाधीशांसह ऍड. दत्तात्रय लिंभोरे, ऍड. आदिनाथ कड, ऍड. प्रवीण पडवळ, ऍड. गोपाळ शिंदे, ऍड. मीरा भगत, ऍड. नंदिनी बिडवे, ऍड. श्रद्धा भालेराव, ऍड. तिलोत्तमा साळुंके या बार असोशिएशनच्या सदस्यांनी पॅनेल जज म्हणून काम पहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील बार असोशिएशनचे ऍड. प्रदीप गोरडे यांनी तर ऍड. प्रफुल्ल गाढवे यांनी आभार मानले.
- दाखलपूर्व खटले
खटल्याचा प्रकार….ठेवलेली प्रकरणे…तडजोड प्रकरणे….वसूल रक्कम
बॅंक रिकव्हरी…165…05…4 लाख
वीज वितरण…00…00…00
पाणीपट्टी, घरपट्टी, इतर…00…00…00
एकूण…165…05…4 लाख - न्यायालयातील प्रलंबित दावे
खटल्याचा प्रकार…ठेवलेली प्रकरणे….तडजोड प्रकरणे…. वसूल रक्कम
बॅंक रिकव्हरी…184…00…00
तडजोडयोग्य फौजदारी..251…41…00
वीज बिल…03…00….00
भू संपादन विषयक दावे…137…00…00
मोटार अपघात…121…13…1 कोटी 10 लाख 93 हजार 530
कौटुंबीक वाद…110…09…00
धनादेश कलम…138…276…03…43 लाख 72 हजार 300
इतर दिवाणी खटले…272…17…7 कोटी 69 लाख 91 हजार 716
एकूण…1354…83…9 कोटी 28 लाख 57 हजार 546