ओतूर (प्रतिनिधी) : आळेफाटा (ता.जुन्नर)येथील सी. क्युअर कॅन्सर हॉस्पिटल मध्ये नुकतीच जिभेच्या कॅन्सर ची अतिशय गुंता गुंतीची शासरक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली असून ही ग्रामीण भागातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे येथील कॅन्सर तज्ञ डॉ. अमोल डुंबरे यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना डुंबरे यांनी सांगितले की, एका ३९ वर्षाच्या तरूणाला जिभेचा कॅन्सर झाला होता. त्याची निम्म्याहून अधिक जीभ कॅन्सरने व्यापली होती. या रुग्णाच्या माने मध्येही कॅन्सरच्या गाठी व्यापलेल्या होत्या च्या मानेमध्ये कॅन्सरच्या गाठी आल्या होत्या. अशा पेशंटमध्ये जिभेचे पुनर्निर्माण करणे अतिशय गरजेचे असते कारण अस केले तरच सदर रुग्ण बोलू शकतो, अन्न गिळू शकतो. असाच एका रुग्णाची कॅन्सर हॉस्पिटल आळेफाटा येथे यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली असल्याची माहिती कॅन्सर सर्जन डॉ. अमोल डुंबरे यांनी दिली.
सी. क्युअर हॉस्पिटल मध्ये सलग नऊ तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. अमोल डुंबरे, डॉ.विशाल कुराडे, अमित मुळे यांनी ही शस्त्रक्रिया केली. भूलतज्ञ डॉ.विजेता शिंदे या देखील या सर्जरीमधे सहभागी झाल्या होत्या. जिभेचा कॅन्सर मुळापासून काढण्यात आला. तसेच मानेवरच्या गाठीची शस्त्रक्रिया करून त्याही काढण्यात आल्या. हाताची त्वचा वापरून जिभेचे पुनर्निर्माण करण्यात आले असल्याचे डॉ. डुंबरे यांनी सांगितले.
ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ऑपरेशन नंतर आठव्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करण्यात आले. ग्रामीण भागांमध्ये प्रथमच अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले, तर भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत ही बाब चिंताजनक असून तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन ही त्याची मुख्य कारणे आहेत. दरवर्षी साधारणतः ५५ हजार रुग्ण तोंडाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात तरुणांनी या व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन देखील कॅन्सर सर्जन डॉ. डुंबरे यांनी केले आहे.