पिंपरी चिंचवड : विद्यार्थ्यांच्या संशोधन व स्पर्धाप्रवृतीला चालना देण्यासाठी गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय, बालेवाडी तर्फे “टेक्नोबॅश २०२०” यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि. ०५ व ०६ फेब्रुवारी २०२० रोजी या स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. मुकेश चंद्रा (vice-president, TVS Companies), पुणे हे प्रमुख अतिथी होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मुलांनी कशा प्रकारे आपल्या संशोधनावर भर दयावा याबाबत मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापिठातील अभियांत्रिकी (VJTI, Symbiosis, PCCOE, JSPM, DYP, VIT) तसेच राज्य स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद मिळाला आणि त्यात ५०० हून अधिक सहाभागाची नोंद कार्यक्रमात झाली.
बक्षिसे
टेक्नोबॅश २०२० मधील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी बाहेरील विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक श्री. रामभाऊ मोझे यांच्यातर्फे मोफत प्रवेश देण्यात आला. प्रत्येक स्पर्धेत दोन पारितोषिक देण्यात आली. प्रथम पारितोषिक ३५५१ रुपये, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह, तसेच द्वितीय पारितोषिक २५५१ रुपये, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह आणि प्रत्येक भाग घेतलेल्या स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देण्यात आले.
बक्षिस समारंभ संस्थेचे संस्थापक श्री. रामभाऊ मोझे यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे संस्थापक श्री. रामभाऊ मोझे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कामकाजाचे महत्व समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा महाविद्यालयीन तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना झाला. “टेक्नोबॅश २०२०” आयोजित करण्यासाठी प्राचार्य डॉ. अभिजीत औटी यांनी मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांमधील तांत्रिक गूणांना वाव मिळाला.
प्रा. निवेदिता थोरात यांनी “टेक्नोबॅश २०२०” कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. प्रा. माने, प्रा. जमदाडे, प्रा. पटवर्धन, प्रा. शिंदे, प्रा. तुबाची तसेच सर्व विभागातील प्राध्यापकांनी “टेक्नोबॅश २०२०” यशस्वीरीत्या पार पाडण्यास मोलाचा हातभार लावला.