आ. आशुतोष काळे यांच्या संबंधितांना सूचना ः इमारतींची केली पाहणी
कोपरगाव (प्रतिनिधी) -शहरात सुरू असलेल्या विविध शासकीय इमारतींचे काम गुणवत्ता सांभाळून वेळेत काम पूर्ण करावे, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी संबंधितांना दिल्या.
माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोपरगाव शहरातील तालुका पशू लघुचिकित्सालयाच्या संरक्षक भिंतीच्या 56 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यानंतर आ. काळे यांनी शहरात विविध ठिकाणी कामे सुरू असलेल्या शासकीय इमारतींच्या बांधकामाची पाहणी करून माहिती घेतली. त्यात न्यायालय, नगरपालिका, पोलीस ठाणे, बसस्थानक इमारतींच्या बांधकामाची पाहणी केली. या सर्व इमारतींच्या कामांची पाहणी करताना आ. काळे यांनी सदर इमारतींमधील सोयी सुविधांबाबत माहिती घेऊन बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या ठेकेदारांना सूचना केल्या.
यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हिरामण गंगुले, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बॅंकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, पंचायत समिती सभापती पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, फकीर कुरेशी, रमेश गवळी, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, राहुल देवळालीकर, निखिल डांगे, रवींद्र चिंचपुरे, चंद्रशेखर म्हस्के, दिनेश पवार, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे नितीन शिंदे, दिनकर खरे, लक्ष्मण सताळे, रावसाहेब साठे, विजय त्रिभुवन, नितीन त्रिभुवन, सलीम पठाण, संतोष टोरपे, नीलेश पारखे, योगेश नरोडे, ऍड. रावसाहेब जपे, ऍड. विद्यासागर शिंदे, ऍड. शंतनू धोर्डे, ऍड. बाळासाहेब कडू, ऍड. टेके, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. शिरीष लोहकणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता प्रशांत वाकचौरे, अभियंता स्वप्नील डहाळे, काकासाहेब शिंदे, उपअभियंता विजय भंगाळे, आदी उपस्थित होते.