डीसीपीएस धारक शिक्षकांचे हिशोब पूर्ण करा

 

नगर  -डीसीपीएस धारक शिक्षकांचे हिशोब पूर्ण करावेत अन्यथा एनपीएस खाते उघडण्यास शिक्षक बहिष्कार टाकणार असल्याचा, इशारा अहमदनगर जिल्हा जुनी पेन्शन योजना हक्क संघटनेच्या वतीने देण्यात आला. या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ व वेतन अधिक्षक स्वाती हवेले यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले. 

वेतन अधीक्षक स्वाती हवेले यांनी येत्या दोन महिन्यात डीसीपीएस धारक शिक्षकांचे हिशोब पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तर हिशोब पूर्ण झाल्यानंतरच एनपीएस खाते उघडणार असल्याचे शिक्षकांनी स्पष्ट केले.

यावेळी आप्पासाहेब शिंदे, देवीदास पालवे, मंगेश काळे, अंबादास मिसाळ, गणेश म्हस्के, बाळासाहेब निवडुंगे, रमाकांत दरेकर, प्रसाद काळे, अशोक लष्कर, किरण पाठक, एस.एच. भैरठ, ए.आर. बोरुडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.