महावितरणच्या अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी – लाईटबाबत तक्रार करण्यासाठी फोन केलेल्या महिलेशी ओळख वाढवून तिच्या दुकानात जाऊन त्याने विनयभंग केला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 39 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रांत वरूडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वरूडे हा महावितरण कंपनीतील चिखली येथील कार्यालयात कामाला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये फिर्यादी महिलेने लाइटबाबत तक्रार करण्यासाठी आरोपी वरूडे याला फोन केला होता. त्यानंतर वरूडे याने फोन आणि व्हॉटस्‌ऍपद्वारे महिलेशी ओळख वाढविली. फिर्यादीच्या दुकानासमोरून येता-जाता पाहून पाठलाग केला. नोव्हेंबर 2019 मध्ये फिर्यादीच्या दुकानात जाऊन बसला. त्यानंतर पीडित महिलेचा हात पकडून प्रपोज करत विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक आर. एम. घुगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.