मुंबई- महाराष्ट्र सरकारच्या जातपडताळणी समितीने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी 14 डिसेंबर रोजी समितीपुढे हजर राहण्याची सुचना केली आहे.
या प्रकरणात भीम आर्मीने त्यांच्या जात प्रमाणपत्राला समितीकडे अर्ज करून आक्षेप घेतला आहे. ते जन्माने मुस्लिम असताना त्यांनी हिंदु महार असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवली असल्याची तक्रार आहे.
आम्ही या संबंधातील सर्व कागदोपत्री पुरावा जात पडताळणी समितीकडे सादर केला आहे. त्यानुसार त्यांनी वानखेडे यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी 14 डिसेंबर रोजी पाचारण केले आहे. वानखेडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून एका दलित युवकाचा सरकारी नोकरीचा हक्क हिरावला आहे असा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचाही आरोप आहे.