चंदिगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारामध्ये प्रवेश केला होता, अशी तक्रार भाजपचे पंजाबमधील नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पोलिसांकडे देखल केली आहे.
आपल्या तक्रारीच्या आधारे मान यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती बग्गा यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे. आपण पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीचा स्क्रीनशॉट बग्गा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. दमदमा साहिब गुरुद्वारामध्ये भगवंत मान मद्यधुंद असवस्थेत आले होते, असा दावा बग्गा यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.
शिरोमणि अकाली दल प्रबंधक कमिटीनेही अशाच प्रकारचा आरोप पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर केला आहे. 14 एप्रिलला देशभर बैसाखीचा सोहळा साजरा केला जात असताना मान दमदमा गुरुद्वारामध्ये मद्यधुंद अवस्थेत आले होते असे कमिटीने म्हटले आहे. या कृत्याबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही शिरोमणी अकाली दल गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने केली आहे.