पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात जागा उपलब्ध करून दिल्याच्या प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पोलिसांमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. त्यामुळे पैसे स्वीकारल्याच्या प्रकरणाची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतल्याची बाब समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयासाठी मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा ठेका फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. याच कंपनीचे स्पर्श हॉस्पिटल असून या ठिकाणच्या व्यवस्थापनामार्फत ऑटो क्लस्टर येथील काम पाहण्यात येत आहे. गत आठवड्यात श्रीमती सुरेखा अशोक वाबळे, (रा. चिखली) यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी पद्मजा हॉस्पिटलमधील एका डॉक्टरमार्फत स्वीकारल्याचे प्रकरण भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस यांनी उघडकीस आणले होते.
त्यानंतर शुक्रवारी (दि. 30) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. त्याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी पोलीस आयुक्त तर अतिरिक्त आयुक्तांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ऑटो क्लस्टरचे काम फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि. यांना देण्यात आले असून, ऑटो क्लस्टर येथे रुग्ण दाखल करून घेण्यासाठी डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे यांनी एक लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने त्याची आपणामार्फत सखोल चौकशी करून