सरन्यायाधिशांच्या विरोधातील तक्रार बनावट – बार असोशिएशन ऑफ इंडियाने केले न्या गोगोईंचे समर्थन

नवी दिल्ली – सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणात करण्यात आलेली तक्रार खोटी आणि बनावट असून संपुर्ण बार कौन्सिल सरन्यायाधिशांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि या बोगस आरोपांचा आम्हीं निषेध करीत आहोत अशी भूमिका बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतली आहे.

अशा प्रकारच्या बोगस तक्रारींना वावच देता कामा नये. देशाच्या सर्वोच्च न्याय यंत्रणेची व्यवस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असेही बार कौन्सिल ऑफ इंडियाने म्हटले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी म्हटले आहे की आम्ही रविवारी या संबंधात एक बैठक बोलावली असून त्यात आम्ही सरन्यायाधिशांना पाठिंबा देणारा ठराव संमत करणार आहोत. नॅशनल ग्रीन ट्रॅब्युनल बार असोशिएशननेही सरन्यायाधिशांचे समर्थन करीत या आरोपांचा निषेध केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.