मुंबई : चंद्रकांता, युग, ‘फीर लौट आयी नागिन’ आणि ‘राम सिया के लव कुश’ फेम अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप शाहबाज खानवर आहे. या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मालिकांसोबतच शाहबाज खान यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ते अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. त्यांनी महानायाक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मेजर साहब’ चित्रपटात काम केलं आहे. तर अभिनेता सैफ अली खानसोबत ‘एजंट विनोद’, सनी देओलच्या ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ स्पाय’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.