पोलीस निरीक्षकांविरुद्ध तक्रार 

नगर – धनादेश न वटल्याच्या न्यायालयीन प्रकरणात डॉ. प्रकाश कांकरिया यांना कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने 29 मे रोजी राजकीय दडपणातून अटक केली. रात्रभर कोठडीत ठेवून त्यांचा मानसिक छळ व मानहानी केली. राहुरीचे आ. शिवाजी कर्डिले यांची मर्जी संपादन करण्यासाठीच कायद्याच्या चोैकटीत असल्याचा आभास निर्माण करीत पोलीस निरीक्षकांनी हा अतिरेक केला. या प्रकाराची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशीकरावी, अशी मागणी लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद मोभारकर यांनी केली आहे.

मोभारकर यांनी अर्जात घटनेची पार्श्‍वभूमी तपशीलवार दिली आहे. राहुरीच्या न्यायालयाने काढलेले समन्स डॉ. कांकरिया यांना जाणीवपूर्वक न बजावताच परत पाठवणे, अटक वॉरंटची अंमलबजावणी न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर हेतुपूर्वक करणे, हा सारा घटनाक्रम संशयास्पद आहे. यामागे डॉ. कांकरिया यांची सामाजिक बदनामी करणे, आ. कर्डिले व त्यांचे जावई आ. संग्राम जगताप यांची खास मर्जी संपादित करणे, हेच कोतवाली ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे हेतू होते. त्यासाठीच त्यांनी अधिकारांचा गैरवापर केला, असे अर्जात म्हटले आहे.
डॉ. कांकरिया यांनी एका व्यवहारापोटी मुकुंद शांतिलाल अग्रवाल (रा. राहुरी) यांना सन2016 मध्ये किरकोळ रकमेचा धनादेश दिला होता. तो त्यांनी दोन वर्षांनीे बॅंकेत भरला.

एवढ्या कालावधीमुळे डॉ. कांकरिया यांच्या नजरचुकीने त्या खात्यात पुरेशी रक्‍कम नव्हती. परिणामी इनसफिशियंट फंड्‌स अशा कारणामुळे बॅंकेने धनादेश न वटविता परत पाठविला. याबाबत डॉ. कांकरिया पूर्णपणे अनभिज्ञ होते. धनादेश न वटल्याची त्यांना कल्पना न देताच अग्रवाल यांनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेट अँक्‍टच्या 138 कलमानुसार राहुरीच्या न्यायालयात तक्रार दिली, अशी माहिती देऊन देऊन अग्रवाल यांचे आ. कर्डिलेंशी हितसंबंध असल्याचे म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.