मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई – दक्षिण मुंबईचे कॉंग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शिवसेना उमेदवारांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे.

जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यामुळे मिलिंद देवरा यांच्याविरोधात एल टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

शिवसेनेच्या वतीने ऍड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी 8 एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि 171 आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.