मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दिन शाह यांची कन्या हीबा शाह हिच्यावर वर्सोवा येथे दोन महिलांना मारहाण केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हीबा शहा या अभिनेत्री आहेत. त्या आपल्या दोन मांजराच्या लसीकरणासाठी जनवरांच्या दवाखान्यात गेल्या. तेथे एका कुत्र्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. त्यामुळे थांबण्यास सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी राग येऊन मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
हिबा शहा यांनी मारहाण केल्याचे मान्य केले. मात्र त्यासाठी त्या दवाखान्याच्या कर्मचारीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.