तळेगाव दाभाडे – वाढत्या करोना रुग्णांना रेमडीसीविर मिळत नसून, रेमडीसीविर साठेबाजी करणाऱ्याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलिसांवर दबाब आणला. शासकीय कामात अडथळा केला. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी (दि. 20) तक्रार प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात ऍड. रुपाली दाभाडे, प्रवीण मुऱ्हे, वनिता मुऱ्हे, सविता मंचरे, हेमाताई रेड्डी आदींनी तक्रार दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. दाभाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णांचा विचार करता महाराष्ट्रात रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसून 4.75 कोटी रुपयांचा रेमडीसीविर इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्याला ब्रुक्स फार्माच्या संचालकाला पाठिशी घातले.
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता फडणवीस व दरेकर मध्यरात्री विलेपार्ले पोलीस ठाण्यात जावून रेमडीसीविरचा साठा करणाऱ्याची बाजू घेतली. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणला. राज्याच्या विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी करोनाच्या रुग्णांना इंजेक्शन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी खालच्या पातळीचे राजकारण करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.