अकबरुद्दीन ओविसीविरोधात तक्रार दाखल

हैदराबाद: विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अकबरूद्दीन ओवेसींवर हिंदूंविरोधात वक्तव्य करणे आणि मुसलमानांना भडकवण्याचा आरोप करत हैदराबादेतील सुलतान बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसअगोदरच एका गंभीर आजारातून उठलेल्या अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणमधील करीमनगर येथे एका सभेदरम्यान जमावाकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या घटनांचा उल्लेख करताना संघ, भाजपासह बजरंग दल व विहिंपबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल होत. यावेळी त्यांनी त्यांचे “सिर्फ 15 मिनिट’ वाले विधान देखील पुन्हा केले होते. शिवाय, आरएसएसवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असेही ते म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)