स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी एसटीची विशेष सेवा
शिवाजीनगर ते नागपूर प्रवासासाठी बसेसची व्यवस्था; परतीच्या आरक्षणाचीही सुविधा
पुणे – राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उमेदवारांना परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी आणि नेव्हल ऍकॅडमीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना परिवहन सुविधा एस.टी. महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात आणि साडेनऊ वाजता शिवाजीनगर ते नागपूर प्रवासासाठी बसेसची व्यवस्था एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
या गाड्यांचे आगाऊ आरक्षणदेखील सुरू करण्यात आले आहे. यासह परतीच्या प्रवासासाठी 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता नागपूर-पुणे या गाडीचे सुद्धा आरक्षण करता येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा