संत्रा, द्राक्षे उत्पादकांना भरपाई द्या

सोनई  -सध्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आवकाळी पाऊस व वादळामुळे संत्री व द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी केली आहे.

या संदर्भात बेरड यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले असून, त्यात देशात करोनामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जी फळपिके घेतली होती, ती अवकाळी पाऊस व वादळाने नष्ट झाली आहेत. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी वचन दिले. बेरड यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.