वरिष्ठ सल्लागाराच्या कुटुंबीयांना ७१ लाखांची नुकसान भरपाई

पुणे – अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वरिष्ठ सल्लागाराच्या कुटुंबीयांना शनिवारी झालेल्या लोकअदालतीत ७१ लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.

संबंधित वरिष्ठ सल्लागार हे सेवानिवृत्तीनंतर रांजणगाव एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीत ‘अॅडव्हायजर टेक्निकल ट्रेनिंग सेल्स डिपार्टमेंट’ पदावर कार्यरत होते. त्यांना दरमहा एक लाख १० हजार रुपये पगार होता. २२ जून २०१८ रोजी दुपारी एकच्या सुमारास ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव वेगात आलेल्या रुग्णवाहिकेने त्यांना धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला. वरिष्ठ सल्लागाराची पत्नी, मुलगा, मुलगी व आईने अॅड. अनिल पटणी व अॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी व रुग्णवाहिका मालकाविरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. मृत व्यक्तीचे वय, त्यांचा पगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा विचार करून तडजोडीपोटी ७१ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी अॅड. पटनी यांनी लोकअदालतीत केली. विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. यासीन शहा, फाल्गुनी दत्ता, विक्रम कालिकोत व विधी अधिकारी संतोष मोरे यांनी ही भरपाई देण्याचे मान्य केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.