मुंबई – बॉलिवूडची क्वीन आणि पंगा गर्ल म्हणजेच, कंगना राणावत हिने नुकताच आपला ३४ व वाढदिवस साजरा केला. कंगनाच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून तिच्या आगामी ” थलायवी’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. चेन्नईत ‘थलायवी’चा ग्रॅण्ड ट्रेलर लॉन्च इव्हेंट आयोजित केला गेला होता. यावेळी कंगनासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती.
दरम्यान, त्यानंतर कंगनानं एक प्रेस कॉन्सरन्स सुद्धा घेतली. यावेळी कंगनानं स्त्रियांच्या ताकदीवर भाष्य केलं. यावेळचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिच्या एका वक्तव्यावरून तिनं पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
कंगना म्हणाली कि, “गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत अनेक गोष्टी घडल्या आणि आताही होतच आहेत. पण जो कोणी स्त्रीचा अपमान करतो त्याचा विनाश निश्चित असतो. इतिहास साक्ष आहे याला. रावणानं सीतेचा आणि कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला आणि अखेर त्यांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे.
View this post on Instagram
मी स्वतःला या देवतांप्रमाणे समजत नाही. पण मी नेहमीच स्वतःसाठी बोलले आहे. मी कधीच कोणाला इजा पोहोचवली नाही केली नाही. मी फक्त स्वतःची सुरक्षा केली.’ असं कंगना म्हणाली होती. मात्र, काहींनी कंगनाच्या या बोलण्याचा रोख शिवसेनेकडे असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता कंगना आणि शिवसेना यांच्यात पुन्हा वाद रंगणार हे नक्कीच.