लंडन – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 2022 सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी 1998 साली पुरुष क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
स्पर्धेसाठी आयसीसीने पात्रतेचे नियमही घोषित केले आहेत. यजमान इंग्लंड व क्रमवारीतील पहिले सहा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेत एकूण आठ संघांचा समावेश असेल. टी-20 क्रमवारीमध्ये इंग्लंड दुसऱ्या, भारत तिसऱ्या, न्यूझीलंड चौथा, दक्षिण आफ्रिका पाचव्या व वेस्ट इंडीज सहाव्या स्थानी आहे.
इंग्लंड यजमान असल्याने त्यांना स्पर्धेत स्थान मिळले. पात्रतेसाठी 1 एप्रिल 2021 ची क्रमवारी विचारात घेतली जाणार असून भारतीय संघ तिसऱ्या स्थानी असल्याने त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. स्पर्धा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहे.